राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात मोर्चे निघत असतांना आता त्याला प्रतिउत्तर म्हणून सोलापुरात आज संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चावर पोलीसांनी लाठीमार केला आहे. हिंदुत्ववाद्यांनी संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी नसतानाही मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला.