त्रिरत्न बुध्द विहारात चिंतन शिबीर संपन्न
धर्माबाद:नारायण सोनटक्के
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धर्माबाद च्या वतीने तालुका स्तरिय चिंतन शिबीर त्रिरत्न बुद्ध विहार इंदिरा नगर येथे ३० जुलै रोजी रविवारी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे पदाधिकारी तथा केंद्रीय शिक्षक सुरेश लोकडे ,बौध्दाचार्य चंद्रकांत घोंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय चिंतन शिबीरात उपासक व उपासिका यांनी
सहभाग घेऊन बौद धम्माचा प्रचार व प्रसार अधिक गतीमान करण्यासाठी तन-मन-धनाने पूर्ण करण्याचा संदेश दिला.कार्यकृर्ता कसा असावा यांची माहिती दिली.यावेळी भारतीय बौद्ध महासभा तेलंगणा विभागाचे अध्यक्ष रमेश बाबु वाघमारे, मुधोळ तालुका अध्यक्ष आनंद बोथे,बासर अध्यक्ष बाबुराव वाघमारे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जि.पी.मिसाळे,माजी तालुकाध्यक्ष शिध्दार्थ वाघमारे, माजी सभापती गंगाधर जारिकोटकर, पत्रकार चंद्रभिम हौजेकर यांच्या प्रमुख उपस्थित सहभागी शिबीरार्थीनां प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी भोगाजी तंगाणे, माधव शेळके, गौतम कैवारे,सुरेश देवके, भिमराव बुद्धिवंत, मिलींद लोखंडे, राहुल बुद्धिवंत, अनिल सुर्यकार, संजय गायकवाड, शेषराव सातेलू, विलास कदम,सौ अनुसया गूडेकर,ललीता कंधारे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष
सदानंद देवके,सरचिटणीस तथा बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर कोषाध्यक्ष सुभाष कांबळे, महिला उपाध्यक्ष सौ उज्वला चौदंते, संस्कार उपाध्यक्ष माधव वाघमारे , सचिव तथा बौध्दाचार्य नारायण सोनटक्के, संरक्षण उपाध्यक्ष गणेश वाघमारे, कार्यालयीन सचिव अँड. मनोहर लोकडे यांनी परिश्रम घेतले.