धर्माबाद तालुक्यात मागील आठवड्यात सतत पावसाच्या कहरामुळे डोळे येणे सर्दी खोकला व तापाने लोक फनफनत असुन ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे रुग्ण दररोज वाढत आहेत .
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात आठवडाभर सतत अतिवृष्टी झाल्याने वातावरणात बराचसा बद्दल होवून साथीचे रोग वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये डोळे येणे, सर्दी, खोकला ,ताप येणे इत्यादी रोगाने थैमान माजवले आहे.,त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रांगा दिसून येत आहेत.
साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून औषध वाटप करण्याची गरज आहे, अशी सुज्ञनागरिकांत चर्चा होत आहे.
जुन महिना पावसा अभावी कोरडा गेला असून जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातले. वातावरणात सकाळी गारवा जानवत आसुन दुपारी अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत त्यामुळे सर्दी, ताप, खोकला,व डोळे येण्याच्या साथीच्या रोगाने धर्माबादकर बरबटलेले दिसत आहेत
ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे रुग्णाच्या रांगा लागल्या असुन रूग्णाची संख्या 100 पासून 310 पर्यंत गेलेली आहे
धर्माबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन बरगे यांनी साथीच्या रोगापासून सतर्क राहण्याचा इशारा दिला . घराबाहेर जाताना मास्क , चस्मा वापरावे, योग्य अंतरावरून समोरच्या व्यक्तीला वार्तालाभ करावे, स्वच्छ हात पाय धुऊन स्वच्छता राखण्याचे नागरिकांना आव्हान केले