1 ऑगस्ट या दिनाचे औचित्य साधून प्रभा हिरा गांधी वडोली हायस्कूल वडोली येथे लोकमान्य टिळक, लोकनेते राजारमबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तीन नेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून सन 2023 मध्ये एस एस सी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गावातील नागरिक श्री. हरी चावरे श्री.प्रदिप चौधरी व कू. शुभांगी गावित यांच्या विद्यमाने रोख पारितोषिक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जानू माळी साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व दिशादर्शक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भसरा, उपाध्यक्षा शशिकला चौधरी, उपसरपंच रघुनाथ भोये, कृष्णा गावंढा,बच्चु वड, प्रल्हाद कांगणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिकांत भोरे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.वाघ सरांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.घरटे सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.