देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष होवून सुध्दा देशाच्या चौथ्या आधार स्तंभ मानला जाणारा पत्रकार मात्र अजूनही सुरक्षित नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांची घटना होय संदीप महाजन यांनी आमदारांच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्याने आमदाराने गावगुंड यांच्या साहाय्याने पत्रकार संदिप महाजन यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळाली .
सदरील घटना ही निदंनिय असुन पत्रकारांच्या स्वांतत्र्यावर गदा आणणारी असल्याने दि. १७ आगस्ट रोजी धर्माबाद येथील सर्व पत्रकार संघटनेतील पत्रकार बांधवाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याच्या परिपत्रकाची पानसरे चौकात जाळून होळी केली व आमदार किशोर पाटील मुरादाबाद, किशोर पाटलाला शिक्षा झालीच पाहिजे पत्रकार संघटना जिन्दांबाद, अशा घोषणा देण्यात आल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवुन आमदार किशोर पाटील यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या करिता निवेदन देवुन निषेध करण्यात आले
यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी. पी.मिसाळे, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील सतिश पाटील बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे, ,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव, किशन कांबळे,गणेश वाघमारे, सुदर्शन वाघमारे, नारायण सोनटक्के, महेश जोशी, गजानन चंदापुरे, पंडित जाधव. बाबुराव गोणारकर,अब्दुल रज्जाक,नागनाथ माळगे,शिध्दु मटपत्ती, किरण गजभारे इत्यादी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक शिन्दे यांच्या नियंत्रणाखाली आनेराय व भालेराव ट्राफिक पोलीस माधव पाटील,सुर्यवंशी यांनी सुनियोजित संरक्षण दिले
धर्माबाद प्रतिनिधी नारायण सोनटक्के