सुमित राऊत युवासेना उपतालुका प्रमुख यांच्या उपोषणाला यश
अखेर प्रशासनाने दिले लेखी स्वरुपात काम पुर्ण करण्याचे आश्वासन.
प्रशासनाकडे गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा करत असतांना येत असलेल्या अडचणी व प्रशासनाचे जैसे थे धोरण पाहाता, ठाकरे गटाचे सुमित राऊत युवासेना उपतालुका प्रमुख यांनी भातकुली तालुक्यातील बाहाद्दरपुर ते काटआमला तसेच गणोरी ते दाढी-पेढी रस्ता दुरुस्तीचे मागणी प्रशासनाकडे केली असता प्रशासनाने त्यावर कुठलेच प्रतिसाद न दिल्याने मागील वर्षी रास्तारोको अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचे प्रयत्न केले.
तरीसुद्धा कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे दि. 15 ऑगष्ट 2023 रोजी भातकुली येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचे आदेश १० -दिवसापूर्वी प्रशासनाला दिले होते, तरी सुद्धा प्रशासनाचा कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यामुळे दि. 15 ऑगष्ट 2023 रोजी ठाकरे गटाचे युवासेना ऊपतालुका प्रमुख सुमित राऊत व त्यांचे सहकारी चि. विश्वदिप राऊत, चि. सुमित गांजरे, श्री. दामोधर सिरसाट, श्री.भारत हिरेखन यांनी सकाळी ७ वाजता पासुन आमरण उपोषणाला सुरुवात केली असता उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने त्याची दखल घेवून गनोरी ते पेढी हा रस्ता तातडीने पुढिल सप्टेंबर महिन्यात सुरू करन्यात येईल असे लेखी स्वरुपात आश्वासन मुख्य कार्यकारी अभियंता प्रधानमत्री ग्राम सडक योजना अमरावती यांनी दिले
तसेच काटआमला ते बहादरपूर जोड रस्ता हा सुद्धा तातडीने डीसेंम्बर २०२३ या माहिन्यात सुरू करन्यात येईल असे आश्वासन सार्वजनीक बांधकाम उपवीभाग दर्यापूर अमरावती यांच्या कडून मा.अभियंता आखरे साहेब यांनी दिले हे दोन्ही लेखी मा. तहसीलदार येले साहेब भातकुली व ठानेदार वांगे साहेब पोलीस स्टेशन भातकुली यांच्या उपस्थितीत राहुन दिले व त्यांनी स्वता ज्युस पाजू उपोषण सोडवले.