जव्हार प्रतिनिधी-सोमनाथ टोकरे
रायगड जिल्ह्यातील ईशालवाडी येथील नेसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळून मृत्यू पावलेल्या आदिवासी बांधवाना भावपूर्ण श्रद्धांजली व माणिपूर येथील महिलांवर झालेल्या अमानवीय कृत्य घटनेबद्दल युवा आदिवासी संघ मार्फत ३१ जुलै २०२३ रोजी संपूर्ण जव्हार शहर बंद करून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे युवा आदिवासी संघ जव्हार व सर्व आदिवासी समाज संघटना कडून मोठ्या उत्साहात हिरवा देव पालखी काढून आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सदर कार्यक्रमाची सुरवात जव्हार संस्थान चे राजे महेंद्रसिंह मुकणे ,युवराज जयदेव, युवराज मार्तंडराव यांच्या हस्ते सदानंद महाराज यांचे पूजन करून चादर चढवून कार्यक्रमाची सुरवात केली, त्यानंतर राजे यशवंतराव मुकणे महाराज चौक येथून मिनी मॅरेथॉन चे उद्घाटन राजे महेंद्रसिंह मुकणे, युवराज जयदेव, युवराज मार्तंडराव ,विनायक राऊत,गोविंद धांगडा,यांनी झेंडा दाखवून केली, सदर मॅरेथॉन मध्ये एकूण ९९ स्पर्धकांनी सहभागी झाले असून १०किमी अंतर पार करून पुरुष गटांतुन ३,महिला गटातून ३ विजेत्या स्पर्धकांना युवा आदिवासी संघ कडून रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.सदर मिनी मॅरेथॉन करीत पालघर जिल्हा आँथलेटीक असोसिएशन कडून विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले,त्यानंतर दुपारी २ वाजता खडेराव मंदिर येथे नारळ फोडून १५ फुटी आदिवासी संस्कृती चे प्रतीक म्हणून तारपा ची प्रतिकृती तयार करून त्यामध्ये हिरवा देवाची पालखी बनविण्यात आली असून यावेळीं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवा देवाचे पूजन करून भव्य मिरवणूकीची सुरवात केली.सदर मिरवणूक राजे यशवंतराव मुकणे चौक-मांगेलवाडा,अंबिका चौक, गांधी चौक,अर्बन बँक-पाचबती चौक, यशवंतनगर मोर्चा-गोरवाडी-आदिवासी क्रांतिकारक चौक मार्गाने काढून सुरवात करण्यात आली. सदर मिरवणूक मध्ये स्वतः जव्हार संस्थान चे राजे महेंद्रसिंह मुकणे व त्याचे युवराज जयदेव व मार्तंडराव सहभागी झाले होते. मिरवणूक आदिवासी पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक आदिवासी नृत्य मध्ये तारपा नृत्य,ढोल नृत्य, मादोल नृत्य, मोरघा नृत्य,संबळ अशी विविध नृत्य सहभागी होते, तसेच सदर मिरवणूक मध्ये आदिवासी गाणे डिजे वाजवून बांधवानी आनंद घेतला.सदर मिरवणूक मध्ये जवळपास शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाचा शेवट आदिवासी क्रांतिकारक चौक येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जव्हार संस्थान चे राजे महेंद्रसिंह मुकणे, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, सुनीता धुम, आदिवासी नेते हरिश्चंद्र भोये, सभापती विजया लहारे,सचिन शिंगडा,एकनाथ दरोडा, अशोक चौधरी, राजू भोये इत्यादी मान्यवरानी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. सदर जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन साठी युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष प्रवीण पवार, कार्याध्यक्ष राजू भोये, सचिव संजय भला, उपाध्यक्ष सोमनाथ टोकरे,विश्वनाथ, भोये, राहुल घेगड, हिरामण मौळे, महेश चौधरी, खजिनदार दीपक भोये,महिला अध्यक्षा वंदना ठोंबरे, कार्याध्यक्ष संगीता जाधव, सचिव सुनंदा घाटाळ, व युवा आदिवासी संघाचे माजी अध्यक्ष,हेमंत घेगड, महेश भोये, नरेश मुकणे, अशोक राऊत, सल्लागार विनोद मौळे, मनोज गवते, शैलेश दिघे, संदीप माळी,राजेश कोरडा, यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर मिरवणूक साठी जव्हार पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे व सर्व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.