रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिटडाऊन आणि वेटरनरी प्रॅक्टिशनल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10 ऑगस्ट रोजी ठाकूर पाडा गोवेली गाव आणि बांगर पाडा मनमोली गाव, मुरबाड रोड या दोन गावांमध्ये गाई, बैल, म्हशी शेळ्या यांची वैद्यकीय तपासणी केली त्यावर उपचार करून त्यांना लसीकरण केले.
रोटरी क्लबचे व्हेटरनरी डॉ. मनोहर अकोले आणि त्यांचे सहकारी डॉ. प्रशांत बिराजदार यांनी 50 हून अधिक मोठ्या पाळीव प्राण्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार केले, 45 प्राण्यांना लंपी आणि इतर आजारांवर लसीकरण केले.
120 शेळी, मेंढ्या, गाई, म्हशी यांना वंधत्व निवारण औषधांचे डोस दिले. 80 कोंबड्यांसाठी विटामिन प्रीमिक्सचे वाटप केले.
डॉ. अकोले यांनी तिथल्या गावकऱ्यांना पशुधन कसे सांभाळावे यावर मार्गदर्शन केले तसेच 10 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण देखील केले.
त्यानंतर बांगर पाडा येथे आंबा, सिताफळ, पेरू अशा फळझाडांचे वृक्षारोपणही केले अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट प्रदीप बुडबाडकर यांनी दिली.
या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख रो. विकास डोके होते या प्रकल्पाची संकल्पना डॉ. मनोहर अकोले यांची होती.
यावेळी क्लबचे सचिव श्रीनिवासन मुदलियार, सभासद रो. डॉक्टर गिरीश वलीयारे. रो. दिनेश मोरे हे देखील उपस्थित होते.सर्वात शेवटी प्रेसिडेंट प्रदीप बुडबाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड