Type Here to Get Search Results !

डोंबिवली येथे वाहतूक नियमन व व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर प्रशिक्षण शिबिरचे आयोजन



              आज दिनांक 11/8/2023 रोजी सकाळी 10.00 ते 12.30 वाजेचे दरम्यान डोंबिवली वाहतूक उपविभाग हद्दीत शुभम हॉल, स्व.इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व येथे कल्याण वाहतूक विभागातील कल्याण , कोळसेवाडी, डोंबिवली वाहतूक उपविभागातील वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार व ट्रॅफिक वार्डन यांच्याकरिता वाहतुकीची चिन्हे, वाहतूक नियमन व व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 




       सदर प्रशिक्षणाकरिता व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त सहापोउपनिरी श्री. श्रीधर सारंग यांनी उपस्थित राहून PPT द्वारे मार्गदर्शन केले तसेच स्व.इंदिरा गांधी चौक येथे प्रत्यक्ष अंमलदार यांच्याकडून कमी वेळेत जास्तीत जास्त वाहनांचे वाहतूक नियमन कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून घेतले व त्याचा सराव केला . सदर वेळी सपोआ कल्याण वाहतूक विभाग व 5 अधिकारी, 40 अमलदार, 30 वॉर्डन हजर होते.




प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad