जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे आज 77 वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत राजाराम काळे यांनी ध्वजारोहण केले
यावेळी घोडेगाव नगरीचे सरपंच अश्विनीताई तीटकरे उपसरपंच सोमनाथ भाऊ काळे माजी सभापती सखाराम घोडेकर ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे ,स्वप्निल घोडेकर , अमोलभाऊ काळे , रुपाली जंबुकर , जोत्स्नाताई डगळे सुनिताताई भागवत , नंदा काळे , मा. उपसरपंच श्याम शेठ होनराव मा . सरपंच क्रांतीताई गाढवे
,सामाजिक कार्यकर्ते विलास शेठ मुथियान उपसरपंच सोमनाथ भाऊ काळे ग्रामविकास अधिकारी सौ. अलका रहाणे, शैक्षणिक परिषदेचे मा. संचालक अशोक आप्पा काळे किसान सभेचे उपाध्यक्ष राजू शेठ घोडे व्यवस्थापन समितीचे संचालक अमित वाघमारे सौ राजेश्री बागलाणे व बहुसंख्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी विद्यार्थ्यांनी स्काऊटच्या माध्यमातून ध्वजाला सलामी दिली तदनंतर ग्रामपंचायत घोडेगाव च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व सह्याद्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्वांना दूध वाटप करण्यात आले .तदनंतर महाराणी गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्याजवळ माननीय श्री .निलेशभाऊ काळे पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
आंबेगाव तालुका पंचायत समिती कार्यालया समोर समोर गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज मॅडम यांनी प्रथम संविधान स्तंभ यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी स्मिता कोल्हे मॅडम गटशिक्षणाधिकारी सविता माळी मॅडम कक्षअधिकारी अनिल चासकर सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, आंबेगाव तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते .इथे सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव च्या विद्यार्थ्यांनी स्काऊट संचलन मार्फत ध्वजाला सलामी दिली.त्यानंतर अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता समारंभ निमित्त आयोजित उपक्रमातील पंचप्राण शपथ श्री.राजाराम काथेर सर यांनी सर्व मान्यवरांकडून म्हणून घेतली .
तदनंतर घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच सौ.अश्विनीताई तिटकारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . या कार्यक्रमाला सुद्धा घोडेगाव नगरीतील सर्व राजकीय पदाधिकारी , सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव