Type Here to Get Search Results !

हटकरवाडी येथे स्वातंत्र दिनानिमीत्त अनोखा उपक्रम



हटकरवाडी गावामध्ये मैत्रीवेड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबीराचे उद्घाटन डाॅ.रोहित कोरे, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्रिरंग बगडे व मैत्रीवेड फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम बगडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातिल आसपासच्या परिसरातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी गावातिल नागरीकांची व मैत्रीवेड फाऊंडेशनच्या सदस्यांची लक्षणिय उपस्थिति होती याप्रसंगी मोफत रुग्णसेवा डाॅ.रोहित कोरे यांनी केली स्वातंत्र्य दिनानिमीत्त ठेवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले गावामध्ये व संपुर्ण परीसरात असेच सार्वजनिक उपक्रम राबवुन एक वेगळा आदर्श निर्माण करु असे मत मैत्रीवेड फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले याप्रसंगी मैत्रीवेड फाऊंडेशन चे सुजित बगडे, युवराज बगडे,अमित बगडे,बाळराजे बगडे,समर्थ बगडे व अनिल सदगर हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad