भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलतावडे येथे साजरा करण्यात आला. शहीद नमन कोन शिलेचे पूजन करण्यात आले. यावेळी निपुण भारत आणि पंचप्राण शपथ घेण्यात आली.
ज्या ग्रामस्थांनी शाळेला विविध मार्गातून देणग्या दिल्या त्या सर्व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. सखाराम शेळके यांनी विद्यार्थ्यांना सॉक्स व शूज व शिक्षकांनी मुलांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले. दहावी मध्ये 87% गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने मंगल किरवे हिने ध्वजारोहण केले. विस्तार अधिकारी मसळे मॅडम, सरपंच रमेश शेळके, गोविंद शेळके यांनी मनोगत व्यक्त केली. उत्तम शेळके यांच्या वतीने गोड खाऊचे वाटप व ग्रामपंचायतच्या वतीने बिस्किटे व चिवडा वाटप करण्यात आला.
ग्रामस्थांकडून सुद्धा मुलांसाठी बिस्कीट पुडे देण्यात आले. शेवटी मुख्याध्यापक कपिल कांबळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानून वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
कोलतावडे