Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 ला वर्ग-2 जमिनीचा विमा भरून घ्यावा अशी मागणी



प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 ला वर्ग-2 जमिनीचा विमा भरून घ्यावा अशी मागणी नेरले ग्रा प मा.सरपंच श्रीमंत.औदुंबर राजेभोसले यांनी केली आहे.................................सन 2023/24 यावर्षीचा एक रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजना भरून घेण्याचे काम चालू आहे.जमिनीचे वर्गवारी मध्ये वर्ग-1आणि वर्ग-2असे प्रकार आहेत.त्यापैकी फक्त वर्ग-1 जमिनीचा प्रधान मंत्री पीक विमा भरून घेत आहेत.हे चुकीचे आहे.कारण वर्ग-2 च्या जमिनी देखील तालुक्यामध्ये महाराष्ट्रमध्ये 50% च्या आसपास आहेत.वर्ग-2 जमिनी सर्व लागवडीखाली आहेत.7/12 दप्तरला तलाठ्याकडे लागवडीकेलेल्या,पीकांच्या नोंदी आहेत.सरकारी बँका पीक कर्ज देतात.शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेले आहेत. सर्व प्रकारचा विकास केला आहे एम एस ई बी वीज कमिशन देत आहे. महाराष्ट्र शासन कृषी खात्याकडून झाडे लावली आहेत.कृषी खाते,जिल्हा परिषद,पंचायत समिती,वर्ग-२च्या शेतकऱ्यांना सरकारी लाभ देतात ,मग पिक विमा का भरून घेतला जात नाही.असा प्रश्न शेतकऱ्यामधुन उपस्थित होत आहे.आज काही भागात पाऊस जास्त पडला आहे.तर काही भागात म्हणजे करमाळा तालुक्यात अजून मोठा पाऊसच नाही.त्यामुळे काही ठिकाणी पेरणी पण होऊ शकलेली नाही.शेतकरी संकटात आहे.आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावर येत आहे.त्यामध्ये वर्ग-२च्या जमीन असणारा शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेतला जात नाही.त्यामुळे तालुक्यातील महाराष्ट्रातील 50 टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहे.याला जबाबदार सरकार व अधिकारी कर्मचारी असतील म्हणून वर्ग-२ जमिनीचा देखील विमा भरून घेणे आवश्यक आहे.हा भरून घेण्यासाठी तालुक्यातील अधिकारी कर्मचारी व लोक प्रतिनिधी यांनी तात्काळ निर्णय घ्यावा.कारण विमा भरण्याची फक्त तीन दिवस मुदत आहे. शेतकऱ्याला वंचित ठेवू नये अन्यथा आम्हाला त्याबाबतच आंदोलन करावे लागेल असा इशारा पत्रकाद्वारे हिंदवीस्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरले ग्रामपंचायत मा.सरपंच श्रीमंत.औदुंबर राजेभोसले यांनी दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad