Type Here to Get Search Results !

शहापूर येथे समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना क्रेन पडून तब्बल १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू



               आज १/०८/२०२३ च्या पहाटे १ वाजण्याच्या सुमारास शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १७जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ,अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून, सदर घटनेत ३ व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच जखमींना. सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे , या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाचे काम खूप जोमाशोमात चालू आहे पण हा महामार्ग अपघात साठी खूप प्रसिद्ध होत आहे ,या महामार्गाच्या सुरवातीपासून अनेक अपघात इथे घडत असल्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. अशी काहीशी चर्चा असल्याचे बोले जात आहे .


प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad