पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने बळीराजा आंनदून गेला आहे.यंदा शेतीतून अधिक पीक मिळेल, परिवार लेकी बाळे सुखी होतील अशी आस लावून अतिदुर्गम असलेला जव्हार सारख्या ग्रामीण भागात भात लावणीची कामे सुरू झाली आहेत.पारंपरिक गीतांच्या साथीने आनंदात सुरू झालेला हा न्यारा लावणी उत्सव गावागावांतील शेतामध्ये रंगला आहे. चार महिने कष्ट करून आठ महिने पोटाची खळगी भरण्यासाठी शेतातील कामांना वेग आला आहे.
या आदिवासी भागात भात लावणी करताना पारंपरिक लोकगीते म्हणायची पद्धत पूर्वापार आहे .आदिवासी बोलगीतांच्या माध्यमातून महिलांना व नवतरुण मंडळी यांना स्फूर्ती व ऊर्जा मिळते .गाणी म्हणत महिला व नवतरुण कामात तल्लीन होवून जातात.सध्या या भागात ठिकठिकाणी लोकगीतांचे मधुर सुर कानी पडत आहेत.ये रे ये रे माझ्या पाण्या, माझे पोटाची भूक भागाया ,एकीकडे नवतरुण शेतिकामाचा अनुभव यावा या साठी भात लावणीत व्यस्त आहेत.मात्र तरुण मंडळी हे सुध्या तालासुरात कामामध्ये कंटाळा न येवो म्हणून बोलीभाषेतील पोरगे भात लावाय इजो इजो भात लावाय इजो किंवा इतर सध्या पालघर जिल्ह्यात युटूब वरचे नवनवीन येणारे आदिवासी गाणे म्हणत शेतीची कामे उरकण्यात व्यग्र असल्याचे दिसते.