महात्मा फुले चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात काही बांगलादेशी महिला सांशयास्पद् वावरत असल्याचि खात्रीशीर माहिती मपोउनी/ प्रतिभा माळी यांना बातमी दारा मार्फत मिळाली होती, सदर गोष्टीची खातरजमा करण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/ प्रदीप पाटील व पोलीस उपनिरीक्षक प्रतिमा माळी महिला व पोलीस अंमलदार असे स्टेशन परिसरात् शोध घेत असताना एसटी डेपो स्थान परिसरात पाच महिला पुरुष हे संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले त्यांची चौकशी केली असता त्यांना हिंदी व मराठी अशी कुठलीच भाषा माहित नव्हती असे समजताच्। त्याच्याकडे भारतीय असल्याचे कागदपत्रे विचारणा केली असता पाच महिलांपैकी तीन मोठ्या महिला व एक अल्पवयीन बालिका या बांगलादेशीय नागरिक असल्याचे तसेच एक महिला व एक पुरुष हे पती-पत्नी समजून आले बांगलादेशी महिलांची नावे पुढील प्रमाणे 1) लुथफा बेगम जहांगीर आलम, वय वर्ष 46 राहणार नार, तालुका- शाल्ला, बांगलादेश 2 ) जोरना जलाल मिया अख्तर वय वर्ष 23 , 3) मासूमा जोमिरुद्दिन्, वय वर्ष 20 दोन्ही राहणार शोरालीतुफा ,बांगलादेश व अल्पविनन बालिका वय वर्ष 15 यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेला पुरुष इसम रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितिका रघुनाथ मंडळ यांनी तीन मोठ्या महिला व अल्पवयीन बालिका या बांगलादेशी नागरिक आहेत याची माहिती असताना देखील त्यांच्याबाबत पोलिसांना माहिती न देता त्यांना आश्रय दिला होता म्हणून बांगलादेशीय नागरिक महिला त्यांना आश्रय देणारा भारतीय नागरिक यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुण्याच्या तपासात रघुनाथ उदय मंडळ व त्याची पत्नी रीती का वय वर्षी 24 हे आजदेगाव डोंबिवली पूर्व येथे राहत् असून ती देखील बांगलादेशी नागरी असल्याचे व ती सुमारे पाच वर्षापासून पूर्वी भारतात आल्याचे व तिचे खरे नाव आख्खी आयुबल्ली फक्तफक्त राहणार, सिलेक्ट ,जिल्हा सोनमगंज, बांगलादेश असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बांगलादेशी महिला भारतात कोणत्या कारणासाठी आल्या? कशा आल्या? त्यांना भारतात येण्याकरिता कोणी मदत केली ?यांच्या सोबत आणखीन कोणी बांगलादेशी नागरिक आले आहेत काय याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.
प्रतिनिधी / भानुदास गायकवाड