राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शनिवारी दुपारी ४ वाजता, जव्हार मधील दिव्य विद्यालय येथील १३० दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूचे वाटप करत अल्पोपहार देण्यात आला, दरम्यान या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून हितगुज साधण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती लाभली, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत कला गुणांना वाव आणि शैक्षणिक प्रगती साठी सदिच्छा व्यक्त केल्या, यावेळी जव्हार चे उपविभागीय पोलीस अधीक्षक शैलेश काळे , पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रमिला कोकड व पत्रकार मित्र उपस्थित होते. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा सेवाकृती वाढदिवस आमच्यासोबत साजरा होतो हे खूप आनंददायी असल्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले. शिवाय कॅप्टन विनीत मुकणे यांनी सांगितले की, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ कार्यकर्त्यापर्यंत या दिवशी विविध सेवा कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्याला प्रतिसाद देत अनेक कार्यक्रम साजरे झाले, त्यातील एक भाग म्हणून जव्हार येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस साध्य झाला.