आदिवासी भागात प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी तलावाच्या कडेला कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात.
शेड आहे पण अपूर्ण अवस्थेत असल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात.कै. तुळशी देवजी वळवी रा. खोस्ते गावठाण,काल दिनांक २१/०७/२०२३ यांना देवाज्ञा झाली असता,भर पावसात स्मशानभूमी कडे नेण्यासाठी स्मशानभूमी बंधाऱ्याचा मोठा नाला ओलांडून ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह नेण्यासाठी खूप त्रास होतो, असाच हा त्रास ते १५ वर्षापासून सहन करावा लागत आहे, आणि ते जाऊ दे पण 'खोस्ते गावठाण' या ठिकाणी स्मशान भूमी ही पूर्णपणे तयार न होताच ठेकेदार ने आपली बिले काढून खाली आहेत.
असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणून यांचा विचार ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य स्मशान भूमी लक्ष देतील का त्या बाजूस असल्याने सर्वच गोष्टींचा त्रास होतो.