पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या जन्मदिनानिमित्त जनसंपर्क अभियान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन हे हिरड पाडा येथील गगनगिरी आश्रमशाळा व महाविद्यालयात करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष दिलीप पटेकर, सचिव ज्योती पटेकर आणि सदस्य नकुल पटेकर यांच्या वतीने प्रमुख व्यक्तींचे शाल व श्रीफळ सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांचे स्वागत हे विद्यार्थिनींनी गीत गाऊन केले, प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक गणेश उदावंत यांनी शाळेबद्दल माहिती सांगताना 2003 पासून सुरू झालेल्या या आश्रम शाळेत सुरुवातीला केवळ 40 विद्यार्थी होते. त्या संख्येत वृध्दी होऊन 22 वर्ग व 1103 विद्यार्थी संख्या एवढ्या प्रमाणात वाढले आहे. आश्रम शाळेत 554 मुले व 547 मुली शिक्षण घेत असल्याचे सांगितले.शिवाय, शाळेच्या परंपरेनुसार गेल्या 9 वर्षांपासून इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे ,तर इयत्ता बारावीचा निकाल मागील 3 वर्षांपासून शंभर टक्के लागत असल्याचे सांगण्यात आले.
उपस्थितांपैकी संत रोहिदास चर्मकार आयोगाचे महाराष्ट्र राज्य सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांनीही खासदार गावीत यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवले, तर कोणत्याही परिस्थितीवर शिक्षणातून मात करता येते असा मंत्र दिला, तर अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी विद्यार्थ्यांना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात एका शिक्षकाप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियानांतर्गत जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी विद्यार्थिनींना कायदा आणि त्यातील तरतुदी तसेच सुरक्षितता बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या वेळी आश्रम शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांचे आरोग्य शिबिराचे आयोजन, खाऊ वाटप जन्मदिनाच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी तहसीलदार लता धोत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, गटविकास अधिकारी ईश्वर पवार, सामाजिक कार्यकर्ते स्नेहल मुकणे, मंगेश मुकणे आणि इतर अधिकारी व गगनगिरी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.