Type Here to Get Search Results !

मोखाडा | कुर्लोद गावातील नागरिकांना तालुका ठिकाणी जाण्यासाठी जीवघेणा प्रवास.



 पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेला मोखाडा तालुका मधील कुर्लोद ग्रामपंचायत अंतर्गत येणारे पाडे  शेड्याचापाडा , आंबे पाडा , रायपाडा , जांभुळ पाडा या गावातील रहिवासी असणाऱ्या ग्रामस्थांना येथील दळणवळणाच्या सोयी सुविधा नसल्याने येथील नागरिक हा थेट तालुका ठिकाणी पोहचत असतो परंतु त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी येथील नागरिक हा पिंजाळ नदीवर येण्या जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पावसाळ्यातील ४ महिने  दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. 

  सरकार आणि प्रशासन कधी मुलभूत सुविधा करणार आहे. कोणाचा जीव गेल्यांनातर सरकारला जाग येणार आहे का अशा देखील येथील नागरिकांचा म्हणणे आहे एकीकडे सरकार ७५ वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत आहे. परंतु मुंबई पासून अवघ्या १०० किमी असणाऱ्या मोखाडा तालुका आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. आता तरी या बातमीचा बोध घेवून लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन आणि शासन लक्ष घालतील का अशा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad