सर्वत्र दोन दिवसापासून चाललेला पावसाचा धुमाकूळ , कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा नाकर्तेपना ,आणी त्यामुळे डोंबिवली करांचे होणारे हाल पाहता इथली परिस्तिथी फार दैनीय झालेली आपण पाहतो आहे,
त्यात् वाहतूक विभाग उल्लेखनीय काम करताना दिसतो आहे , दोनदिवसा पूर्वी डोंबिवली पूर्व टिळक चौकात खड्डे भरणे असो, अपघात ग्रस्तांना हॉस्पिटल मध्ये पोहचावणे असेल , अशी कामगिरी वाहतूक पोलिसांकडून होत असते ,
सगळी कडे पाणी भरल्या मुळे ट्राफिक जाम मुळे सर्व जनतेला त्रास सहन करवा लागत होता , डोंबिवली पूर्व येथील , विक्को नाका येथील अनंतम रेजन्सी येथे गुढगा भर पाणी भरले असल्या मुळे ट्राफिक सकाळ पासून जाम होते या अश्या परिस्तिथीत सकाळ पासून पो.नी. क्षीरसागर यांच्या अध्यक्षते खाली अंमलदार वाघ , व ईत्तर सर्व पोलिसांनी पूर्ण दिवस रेजन्सी चौकातील ट्राफिक क्लिअर करण्याची उत्तम कामगिरी केली त्या मुळे नागरिकांना होणारा त्रास थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले पोलिसांनवर होणाऱ्या टीका सोडून आपण त्यांच्या ह्या कामगिरी बद्दलही प्रशंसा केली पाहिजे .
प्रतिनिधी / भानुदास गायकवाड