मलकापूर आगाशिव नगर नगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक पाच मध्ये फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व अतुल बाबा भोसले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून फॉगिंग मशीनद्वारे मोफत औषध फवारणी करण्यात आली पावसाळ्याच्या दिवसात या प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी व गटर तुंबून राहिल्याने डेंगू ,मलेरिया ,हिवताप चिकनगुनिया ,यांसारख्या आजाराने नागरिक बळी पडतात प्रभाग 5 मधील रहिवाशी बहुतांश सर्व सामान्य नागरिक असल्याने या रोगांचे औषध उपचार लोकांच्या आवाक्या बाहेर असतो म्हणून फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते (मामा), किरण गायकवाड व स्वप्नील जाधव यांच्या संकल्पनेतून फॉगिंग मशीन विकत घेतली व या मशीनद्वारे प्रभाग 5 मध्ये रोज संध्याकाळी औषध फवारणी करण्यात येणार आहे सध्या नगरपालिका परिसरामध्ये डेंगू ,मलेरिया ,सारखे आजाराने शहरात आहे थैमानघातले असताना नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असताना फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे विश्वस्त बाळासाहेब सातपुते यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना दिसत आहे. तत्पूर्वी सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रभाग मधील मेहरबान नंदू बागल, बंडा दिवटे, किशोर येवले, वासू फाळके, पोलीस पाटील प्रशांत गावडे, डॉ.सारिका गावडे, अजित शिंदे व प्रभाग मधील नागरिक उपस्थित होते