जव्हार :-सोमनाथ टोकरे
मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथील थाळेकर वाडीतील दोन शाळकरी मुलांना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर काढणार्या थाळेकर बंधुची प्रदीप वाघ यांनी भेट घेतली.तसेच देवबांध नदीवर पूल किंवा साकाव होणे गरजेचे आहे या बाबतीत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे असे मोखाडा समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले, यावेळी सरपंच बाळु घाटाळ, ग्रामस्थ देवचंद जाधव, रघुनाथ गांगुर्डे, संदीप थाळेकर,बाळु गांगुर्डे, वासुदेव बांडे उपस्थित होते.
तसचे करोळ पाचघर गावाल जोडणारा पुल पाण्याखाली गेल्याने दोन गांवांचा संपर्क तुटला होता सुमारे अडीच हजार लोक वस्ती असलेल्या या गावाला पुराचा फटका बसला आहे या ठिकाणी देखील प्रदीप वाघ यांनी भेट दिली व पुलाची उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
यावेळी सरपंच नरेंद्र येले, उपसरपंच परशुराम अगिवले, राजाराम येले,नागेश भागवत, उपसरपंच नंदकुमार वाघ, गणेश वाघ
उपस्थित होते.