संलग्नता : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र राज्य धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे होणाऱ्या दिनांक १७ ते २० ऑगस्ट राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेकरीता जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा दिनांक ०५ ऑगस्ट वार शनिवार रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे ठेवण्यात आली असुन जालना जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट क्लब, यांनी नोंद घ्यावी.ह्या निवड चाचणीतून निवडण्यात येणारा संघ जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ह्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
🏏 १) आधार कार्ड
🏏 २) शाळेचा बोनाफाईड
🏏 ३) जन्माचा दाखला
🏏 ४) दोन पासपोर्ट साईज फोटो
🏏 ५) खेळाडूंचा जन्म ०१/०१/२००७ किंवा त्यानंतरचा असावा जन्म पुराव्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजी व मराठीमध्ये असलेल्या एसएससी बोर्डाची जन्म तारखेची नोंद असलेले प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जन्म प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रत्येकी शंभर रु फीस फक्त आकारली जाणार आहे.ह्या निवड चाचणी स्पर्धेत जिल्हाभरातून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे (अध्यक्ष ) राजाभाऊ थोरात, उपाध्यक्ष प्रा.डॉ भुजंग डावकर सर,प्रा.संत्सग मुंडे सर,प्रा.भरत जऱ्हाड सर, संतोष नागवे, अशोक संचेती, प्रा बि.जे.पाटोळे सर, बाबासाहेब गिते सर, दत्ता पवार, सौ.स्वाती नागवे, किरण पाटील,तुकाराम दौंड सर,हरी वाडेकर,योगेश जाधव,अक्षय पवार आविष्कार तुमास्कर,रवि रनमाळे, वैभव यादव, सुनिल भोसले,सोमिनाथ शिंदे, यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क अंबादास शेषराव गिते ( सचिव ) जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन :- 9763501333
योगेश जाधव :- 8080464538
ठिकाण:- 🏏🏏 अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना
वेळ : सकाळी 11 ते 02:00 🏏🏏🎾🎾