जव्हार :-सोमनाथ टोकरे
वाडा तालुक्यातील गारगाव परळी विभाग जिल्हा परिषद गटामध्ये खासदार कपिल फाउंडेशन तर्फे वरसाळे ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रकाश शेलार यांच्या प्रयत्नाने वरसाळे जिल्हा परिषद शाळा, बोर शेती, चारण वाडी, सागपाडा,उजेणी, या पाच जिल्हा परिषद शाळांमध्ये दि.27 जुलै 2023 रोजी शालेय शैक्षणिक वह्या, मुलांना पाणी पिण्यासाठी पाण्याचे फिल्टर वाटप, तसेच खाऊ इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित वरसाळे माजी ग्रामपंचायत सरपंच प्रकाश शेलार, संतोष धापटे, मुकुंद फुफाणे, अंकुश घाटाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असताना कोणताही जात-पात पक्ष न करता माझ्या आदिवासी समाजातील गोरगरीब घराण्यातील जिल्हा परिषद मध्ये मुले शिक्षण घेत असतात. त्यांची परिस्थिती अत्यंत अलाखीची असल्यामुळे पाहिजे तेवढ्या वस्तू शैक्षणिक साहित्य खरेदी करू शकत नाहीत. मी स्वतः खासदार कपिल पाटील फाउंडेशन यांना विनंती करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी सांगितले. आणि माझ्या विनंतीला मान देऊन कपिल पाटील फाउंडेशन यांनी माझ्या आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषद शाळा शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
वरसाळे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश शेलार