जव्हार :-सोमनाथ टोकरे
जिवित हानी टाळायची असेल तर गुहिर आश्रमशाळा येथील वाकलेले विद्युतखांब व ट्रान्सफार्मा नव्याने पुन्हा उभे करावेत अशी मागणी उप अभियंता विज वितरण कार्यालय वाडा यांना केली!
आज सोमवार दि.०३/०७/२०२३ रोजी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने शासकिय आश्रमशाळा गुहिर येथे मुख्याध्यापक पाटील सर यांची भेट घेवुन, आश्रमशाळेसाठी होणारा विजपुरवठा ट्रान्सफार्मा व विद्युतखांब वाकलेले व पडायला आलेले आहेत ते प्रत्यक्ष जागेवर जावुन पहाणी केली,सदर वाकलेले पोल हे कधीही पडू शकतात व जिवितहानी होवू शकते अशा प्रकारचे पत्र गुहीर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांनी २०२१-२२ मध्ये जेव्हा विद्युतखांब थोडे वाकले होते तेव्हाच दिले होते,आणी आत्ता २०२३ या वर्षी पावसात विद्युतपोल जास्त वाकल्याने कधीही पडुन जिवितहानी होवू शकते म्हणून पुन्हा मुख्याध्यापक यांनी विजवितरण कार्यालयात पत्र दिले होते, परंतू विजवितरण अभियंता हे जाणून-बुजुन दुर्लक्ष करत आहेत असे समजते,आज प्रत्यक्ष या ठिकाणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा व आम्ही पहाणी केली असता असे लक्षांत येते की पावसामुळे जमीन नरम झाली असुन जोराचा वारा-वादळ आलाच तर वाकलेले विद्युतखांब व ट्रान्सफार्मा खाली पडुन मोठी दुर्घटना होवु शकते,सदर आश्रमशाळेला लागुनच विजपुरवठा करणारा ट्रान्सफार्मा असुन इथे विद्यार्थांचा वावर असतो,या आश्रमशाळेत गोरगरीबांची हजारो मुले शिक्षण घेवुन निवासी राहत आहेत,म्हणून विदयार्थांच्या सुरक्षणार्थ लगेच वाडा येथील विजवितरण कार्यालयात जावून आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देवुन पडायला आलेले विद्युतखांब व ट्रान्सफार्माचे खांब जमिनीत खोदकाम करुन पुन्हा उभे करावेत अशी मागणी करणेत आली त्यावेळी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा,वाडा नगरपंचायतचे मा नगरसेवक अरुण खुलात,जिल्हा संघटक नीतीन दळवी,वाडा तालुका अध्यक्ष दयानंद हरल व वकील किरण भोईर उपस्थित होते!