जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार,दि.४ सन १९९२-९३ मध्ये तात्कालीन ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात कुपोषणामुळे शेकडे आदिवासी बालके दगावली होती. तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जव्हार ला भेट दिली व त्यांनी या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जव्हार भागात रस्त्याचे जाळे विणण्याचे आदेश दिले त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आली. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे मुख्यालय जव्हार येथे सन १९९३ साली सुरू केले होते. जव्हार,मोखाडा, विक्रमगड,वाडा या आदिवासी बहुल तालुक्यात रस्ते होऊन गाव- पाडे शहराला जोडले जाईल व ग्रामीण भागाचा विकास होईल हा दृष्टिकोन यामागे होता. परंतु आता या कार्यालयात शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सुधारित आकृतीबंधानुसार या कार्यालयात एकूण ४८ कर्मचारी कार्यरत असणे आवश्यक आहे परंतु सध्या या कार्यालयात १ शिपाई , २ लिपिक, १ शाखा अभियंता ,१ स्थापत्य सहाय्यक अशे ऐकुन ५ कर्मचारी कार्यरत आहे. उर्वरित सर्वच कर्मचारी पालघर येथे काम करीत आहेत. जव्हारच्या बांधकाम मुख्यालयाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या नावाची नुसती पाटी दालनाच्या बाहेर लावली आहे. मात्र ते कधीही या कार्यालयात फिरकलेच नाहीत. जव्हारच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मुख्यालयाचा दर्जा असूनही त्याचा काही एक फायदा जव्हार, विक्रमगड, मोखाडा, वाडा या आदिवासीबहुल तालुक्यांना मिळत नाही. त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. ठाणे जिल्हा विभाजना नंतर १ ऑगस्ट २०१४ साली ३६ वा नविन आदिवासी जिल्हा म्हणून पालघर जिल्हा आस्तीतवात आला. पालघर जिल्हा निर्मीती नंतर जव्हारच्या अपर जिल्ह्याचा दर्जा हळुहळु कमी करण्यात आला व अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच महत्वाचे विभाग पालघर येथे हलविण्यात आले व पुन्हा जव्हार, मोखाडा तालुका भकास झाला .एकंदरीत पाहिलं तर उरलं सुरलं जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालय शिल्लक होते.मात्र ते ही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी कोरोना काळात रिकामं झालं त्यामुळें येथील बांधकामाच्या समस्या सोडविण्यासाठी बांधकाम विभागाच्या जव्हार मुख्यालयातील, पालघर येथे कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग जव्हार मुख्यालयात आणुन जि.प बांधकाम विभागाचे मुख्यालय पुर्ववत सुरू करावे अशी मागणी जव्हार,मोखाडा तालुक्यातुन केली जात आहे.
जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मुख्यालयातील कर्मचारी पालघर जिल्हा झाल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात परंतु जव्हार,मोखाडा येथील बांधकामांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचे दोन अधिकारी येत्या आठ दिवसांत जव्हार मुख्यालयात पाठविले जातील
प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर