Type Here to Get Search Results !

वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत रंगला रानभाज्या महोत्सव



जव्हार:-सोमनाथ टोकरे 

.

मोखाडा तालुक्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना रानभाज्यांची माहिती मिळाली पाहिजे या हेतूने वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी तब्बल विस रानभाज्या गोळा करून प्रदर्शन ठेवले होते, त्यामुळे या रानभाज्या गोळा करणे त्यांची माहिती व संकलन करणे असा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.ते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी  प्रदीप वाघ,  नंदकुमार वाघ. संजय वाघ,  रमेश बोटे, नरेंद्र येले,  विठ्ठल गोडे तसेच शाळेचे शिक्षक  शतानंद भेरे, निलेश गांगवे,शाम फसाळे, हर्षदा खादे व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad