Type Here to Get Search Results !

कारखान्यांनी ऊस बिले थकविल्याने ऊस उत्पादक अडचणीत | हफ्ते लवकर न दिल्यास जनशक्ती संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा


     

कारखान्यांनी ऊस बिलाचे हफ्ते थकविल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.  हे थकीत हफ्ते लवकरात लवकर न दिल्यास जनशक्ती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.


करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना उजनी धरण पर्यायाने बॅक वाॅटर खर्या अर्थाने वरदायिनी ठरत आहे. मात्र तालुक्यातील कारखाने उस उत्पादकांच्या बाजूने कधीच उभा रहात नाहीत. हे आत्तापर्य॔त दिसून आले आहे. भैरवनाथ शुगर विहाळ, कमलाई, मकाई कारखान्यांनी डिसेंबर पर्यंतचे हफ्ते अदा केले आहेत. त्यानंतरचे हफ्ते मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.


वास्तविक करमाळा तालुक्यात ऊसाचे मोठे क्षेत्र असताना  सुरूवातीला तालुक्यातील साखर कारखान्यांनी दराबाबत दाखविलेली उदासीनता, वेळेवर हफ्ते न देणे यामूळे बाहेरच्या कारखान्यांना ऊस घालण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू आहे. ही संधी  अंबालिका शुगर (राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व बारामती एँग्रो या सारखे कारखाने उठवताना दिसत आहेत. पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा,माळशिरस तालुक्यातील साखर कारखाने ऊस गाळपासाठी घेऊन जात आहेत. ही परस्थिती बदलण्यासाठी तालुक्यातील कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस उस उत्पादकांचे हित जपणे गरजेचे आहे.

∆ यंदा उजनी धरण मायनसमध्ये गेल्याने उसाच्या लागवडी रखडल्या आहेत. शेतकन्यांनी मका व इतर पिकांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पाण्याची कमतरता आणि कारखानदारांच्या उदासीन भूमिकेमूळे शेतकऱी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad