सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे साखर उत्पादक कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे जर जागतिक मार्केटमध्ये सध्या साखर 80 रुपये किलोने जात आहे तर भारतात आणि महाराष्ट्रात ही साखर 35 रुपये किलोने विकली जात आहे. जर साखर निर्यात केंद्र सरकारने सुरू केली तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला सहा हजार रुपये प्रतिटन भाऊ दिला जाऊ शकतो आणि ऊस उत्पादक शेतकरी हा फायद्याचा ठरू शकतो पण सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहे.