Type Here to Get Search Results !

चक्कर येऊन महिला पडली पैनगंगा नदी पात्रात. चातारी बोरी येथील घटना



 आता सर्विकडे पाण्याने हाहाकार माजविला असून,यवतमाळ जिल्हा तर गेली पन्नास वर्ष पासून पाऊस पडला नाही तसा पाऊस अवघ्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात ३२४ मिमी पावसाची  नोंद  झाली आहे.प्रशासनाने वेळोवेळी सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला होता.नदी, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणीही पुलावरून जाऊ नये असे आवाहन केले गेले होते.नदी, नाले हे पाऊस उघडला गेला असला तरी खळखळून वाहत आहेत.धबधबा, सहत्स्त्रकुंड ,या सारख्या पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.त्यातच सेल्फी काढणे हे देखील केवढे जिकीरीचे व जोकिमदारीचे असते. तसेच कुणाला असा सुंदर नयनरम्य नजारा मनमोहक असला तरी कधी कोणाला असा उसळत्या लाटा व विशिष्ट अंतरावरून पडणाऱ्या धारा यामुळे एखाद्याला  चक्कर येणे सुद्धा नाकारता येत नाही.अशा वेळी विशिष्ट अंत्तर ठेऊन जोखिमदारी बाळगणे आवश्यक असते.                                         अशीच घटना ढाणकी पासून काही अंतरावर असलेल्या पैनगंगा नदी पात्राजवळ बोरी चातरी येथे घडली .सौ.माया अमोल पतंगे ही पर्जना येथे आपल्या माहेरी धोंडे खाण्यासाठी आपला पती अमोल पतंगे व दोन लेकरा  सोबत  आली होती. परत आता आपल्या सासरी वडगाव कडे जात असताना पुढून ऑटो येत होता हे पाहून पतिराज अमोल पतंगे यांनी आपली दुचाकी थोडी साइडला लावली व सौ. माया यावेळी दुचाकीच्या खाली उतरली त्यातच माया ला चक्कर आली व ती नदी पात्रात पडली त्यावेळी हे दृष्य लहानश्या मायाच्या चिमुकलीने आपला पिता अमोल यास  सांगितले.पिता मागे फिरून पहातो तर काय पत्नी नदीत पडल्याचे दिसले .घटनास्थळी आजुबाजूच्या लोकांनी अमोल यास  सावरले.मायाचा शोध अद्याप लागला नसून शोध मोहीम सुरू आहे. सदर महिला कुणास आढळून आल्यास संपर्क साधावा असे आव्हान परजना गावचे पोलीस पाटील गोविंद सावंत  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad