आज दिनांक 10/07/2023 रोजी 11:00 ते 13:30 वाजे पर्यन्त् डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि श्री धात्रक, मोटार वाहन निरीक्षक,उपप्रादेशिक परिवहन विभाग,कल्याण यांचेसह संयुक्तपणे स्व.इंदिरा गांधी चौक,डोंबिवली पूर्व व मच्छी मार्केट, दीनदयाळ चौक परिसर, डोंबिवली पश्चिम येथे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चार चाकी, रिक्षा अशा एकूण 86 कसूरदार वाहनावर धडक कारवाई केली असून 2,56,100/- रूपये दंड आकारण्यात आला असुन त्यापैकी 18,300/- रूपये दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेसह ही संयुक्त कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधि / भानुदास गायकवाड