जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हारला तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या पिंपळशेत, तीलोंडा, चांभारशेत, आकरे या 4 ग्रामपंचायत मधील गावांना अती मुसळधार मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे सर्व नदी नाल्यांना ओसांडूल पूर आला होता. त्यामूळे गावांना जोडणारे रस्ते व त्यावरील अरुंद पुल असल्यामुळे सर्व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जव्हार पिंपळशेत रस्तावरील कोतीमाळ, पागीपाडा, शींगारपाडा, माडविहिरा या गावांना जोडणाऱ्या पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जव्हार खरोंडा रस्त्यावरील मोठा पुल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सर्व भागाची पाहणी करण्यात आली. व लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी व पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी सौ.गुलाब विनायक राऊत (माजी महिला व बालकल्याण समिती सभापती), .विनायक राऊत (शिवसेना तालुकाप्रमुख जव्हार), PWD उपअभियंता विजय भदाने, विजय संखपाळे,राजू भोये(युवासेना तालुका प्रमुख), सरपंच कासटवाडी . कल्पेश राऊत, सरपंच पिंपळशेत . दिनेश जाधव, राहुल शेंडे, धर्मेंद्र होळकर, रमेश हांडवा व ग्रामस्थ उपस्थित होते.