जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार तालुक्यातील जव्हार ते झाप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 77 ते झाप रस्त्यावर प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास.लवकरात लवकर रस्ता करण्याची सार्वजनिक बांधकाम विभाग कडे झाप ग्रामपंचायत ची मागणी.
दिनांक.24जुलै 2023 रोजी झाप ग्राम पंचायत ची मासिक सभा लोक नियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय झाप येथे पार पडली असता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 77 ते झाप गाव व भोपतगड पर्यटन स्थळकडे जाणारा रस्ता खूपच खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत यावर प्रवास करत असताना मुठीत जीव घेऊन करावा लागतोय प्रवास या विषयावर चर्चा झाली असता लगेचच लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या सोबत उपसरपंच सखाराम वड,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी, विलास बागुल, युवराज वाघ,अनिता खाणझोडे,शीतल मंगात,कल्पना वातास,लता राठड यांनी रस्त्यावर जावून पाहणी केली व सदर रस्ता लवकरात लवकर व्हावा असा ठराव करून मागणी करण्यात आली.यावेळी झाप ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की,गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय पण शासन दुर्लक्ष करते.याच मार्गावर जिल्हा परिषद शाळा ,पोस्ट ऑफिस,2 गावे भोपत गड किल्ले,ग्रामपंचायत कार्यालय,3 अंगणवाड्या व 2000 लोकांची वस्ती यांना करावा लागतोय खडतर प्रवास यासाठी मागच्या वर्षी पालघर जिल्हाधिकारी बोडके साहेब यांना या रत्याची निवेदन देऊन रस्ता मंजुरीची मागणी केली होती याची दखल घेत कलेक्टर साहेब यांनी सदर पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), व जिल्हा परिषद यांना दिला होता परंतु या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.तरी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता मंजूर करावा अशी प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे.
कोट......
जव्हार तालुक्यातील भोपत गड ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळाला शासनाने भरीव निधी देऊन आणि रस्त्याची सोय केली तर तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो.
झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा.