देशात स्त्रियांवर वाढत असलेले अत्याचार पाहता या देशात "बेटी बचाव बेटी पढाव" म्हणने कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे..?मणिपूर घटनेचे पडसाद हे जगभरात हळहळ व्यक्त होत असून अमानवी प्रकार बद्दल सर्व स्थरावरून निषेध व्यक्त होत आहे.
समस्त मानवजातीला काळीमा फासणारी मणिपूर येथील घटना आपल्या माता-भगिनींना भररस्त्यावर नग्न दिंड काढणाऱ्या निच औलाद्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणेची मागणीसाठी जव्हार तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आक्रोश व निषेधार्थ क्रांतिवीर चौक येथे रास्ता रोको नंतर जव्हार शहरात आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव हे खेड्या पाड्यातून आदिवासी क्रांतिवीर चौक जव्हार येथी घोषणा देत निषेध केला आहे. व तसेच मणिपूर मधील माता-भगिनींना भररस्त्यावर नग्न दिंड काढणाऱ्या निच औलाद्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणेची मागणी व असे अमानवी प्रकार पुन्हा घडू नये म्हणून आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहजे असे निवेदन हे अप्पर जिल्हा कलेक्टर कार्यालय जव्हार येथे निषेध निवेदन देण्यात आले आहे. जव्हार पोलीसांनी देखील आपली जवाबदारी सहकाऱ्यांनी पारपडली असून सर्व देश भरातून हळहळव्यक्त होत आहे तसेच यावेळी निषेध नोंदविण्यासाठी सर्व आदिवासी समाज बांधव व सर्व संघटना पदाधिकारी बळवंत गावित,करण पवार,अशोक चौधरी,नामदेव खिरारी,रंधा साहेब,देशमुख साहेब,भास्कर दळवी,चौधरी साहेब,गोविंद अवतार,कमलाकर कुवरे,प्रवीण पवार,राजू भोये,एकनाथ दरोडा,कल्पेश राऊत,संजय भला,राहुल घेगड,महेश भोये,नरेश मुकणे,हेमंत घेगड,दीपक भोये,विश्वनाथ भोये,कैलास पागी,अंकुश मोडक, कुणाल सापटा,अजय महाले, पदाधिकारी, महिला वर्ग मधून भावना पवार,ऍड.पलटणकर ,वंदना ठोबरे, संगीता जाधव, वैशाली भोये, संगीता भांगरे, सुनंधा कनोजा, ऍड. मुकणे, सदस्य,कार्यकर्ते,महिला वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.