जव्हार :-सोमनाथ टोकरे
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत लोकसहभागातून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये सामूहिक वृक्षारोपण मोहीम चे दिनांक २५ जुलै २०२३ रोजी सामूहिक वृक्षारोपण व सामूहिक ई शपथ घेवून उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबवले जात आहे.पर्यावरणाचे जतन ,संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे.हा उपक्रम निसर्गाच्या पंचमहाभूते नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रीत करतो.या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्याबद्दल नागरिकांना जागरूक करतो याचाच उद्देश घेवून वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये ९००० हजार आंबेचे रोपे यांचे सामूहिक वृक्षारोपण मोहीम चे कार्य हातात घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष निकम साहेब आणि पंचायत समिती सभापती विजया लाहरे व विस्तार अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या उपस्थित या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निकम साहेब उपक्रमाअंतर्गत येथील स्थानिक नागरिकांना देखील रोजगार मिळू शकतो आणि माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून पालघर कार्यालय क्षेत्रात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सर्वच ठिकाणी नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण असो की ,माझी वसुंधरा अभियान वावर वांगणी ग्रामपंचायत निश्चय केला,नंबर पहिला हे ध्येय नजरेसमोर ठेवून सक्रिय सहभागी होत असते .यामध्ये जागरूक वावर वांगणी नागरिकांना सक्रिय सहभाग हे ग्रामपंचायत चे सर्वात मोठे बलस्थान असून आपल्या ग्रामपंचायत ला नंबर वन बनविण्यासाठी अधिक आत्मीयतेने मनःपूर्वक योगदान देतील अशा विश्वास पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी वावर वांगणी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच विनोद बुधर उपसरपंच रमेश बिज सदस्य यशवंत बुधर साहेब ,सदस्य विजय शिंदे,सुरेश लाखन,सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,शिक्षक आणि इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.