युवा आदिवासी संघ व आदिवासी समाज संघटना कडून सदर घटनेचा निषेध.
जव्हार -सोमनाथ टोकरे
मणिपूर मध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र दिंड काढून अशील वर्तन केल्याप्रकरणी त्याचा देशभरातून निषेध केला जात असून त्याचे पडसाद पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्येही उमटले असून ३१ जुलै रोजी युवा आदिवासी संघ व सर्व आदिवासी समाज संघटनांकडून मणिपूर येथे झालेल्या अमानवी कृत्याचा निषेध दर्शविण्यासाठी जव्हार शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ची हाक दिली असुन जव्हार तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग व सर्व नागरिकांनी सदर घटनेचा निषेध म्हणून सर्व व्यापारी वर्गाने उत्तम प्रतिसाद देऊन आज सकाळ पासून पूर्ण दिवस आपले संपूर्ण बाजारपेठ मधील दुकाने बंद ठेवली असून फक्त अत्यावश्यक सेवा वगळता १००% कडकडीत बंद पाळण्यात आला. असून या घटनेचा निषेध म्हणून आदिवासी क्रांतिकारक चौक येथे सर्व आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन सदर घटना ही निंदनीय असून या सारख्या घटना व आदिवासी समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून निषेध व्यक्त केला. व असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.तसेच नुकतीच अतिवृष्टी मुळे रायगड जिल्ह्यातील ईशाळवाडी येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक चौक येथून पायी मूक मोर्चा काढून संपूर्ण जव्हार शहरात आदिवासी समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करून तारपा चौक येथे कार्यक्रमाचा समारोप केला. या निषेध कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद पालघरचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सदर घटना ही अतिशय वाईट असुन निषेध व्यक्त करून उपस्थित आदिवासी समाज बांधवाना प्रबोधन केले.तसेच पंचायत समिती जव्हार च्या सभापती विजयाताई लहारे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.या निषेध कार्यक्रमासाठी विनायक राऊत, दादाशेठ तेंडुलकर,सचिन शिंगडा, दयानंद लहारे, अशोक चौधरी,तुळशीराम मोरघा,जानु माळी, गोविंद अवतार,संदीप माळी,सोनू खुताडे ,युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष प्रवीण पवार, कार्याध्यक्ष राजू भोये, सचिव संजय भला,खजिनदार दीपक भोये, युवा आदिवासी संघ माजी अध्यक्ष हेमंत घेगड, एकनाथ दरोडा,नरेश मुकणे, महेश भोये,मनोज कामडी, सल्लागार विनू मौळे, विश्वनाथ भोये,,प्रवीण अवतार, विश्वनाथ भोये, प्रमोद मौळे, सरपंच कल्पेश राऊत, राहुल शेंडे, सर्व पदाधिकारी,महिला अध्यक्ष वंदना ठोंबरे, संगीता जाधव निर्मला घाटाळ ,भावनाताई पवार,लीला थालेकर, सुनंदा घाटाळ, इतर महिला भगिनी व सर्व आदिवासी समाज संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.सदर बंद यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक जव्हार यांनी विशेष सहकार्य केले.