वालिव पोलिस ठाणे हद्दीत 31/8/2022 च्या मध्यरात्री मांडबादेवी वसाहत, वालीव फाटा वसई पूर्व या ठिकाणातील एका नागरिकाच्या घरातून सोन्याचे दागिने, मोबाईल,व रोख रक्कम असा एकूण 46000/- किमतेचा मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद् पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .
सदर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंघाने गुप्तमाहितीदारच्या मिळालेल्या माहिती द्वारे रिकॉर्डवरील दोन आरोपीना अटक करून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी 1) राजू जैस्वाल वय वर्ष (20), 2) अजित साहू वय वर्ष (19), 3) सौ. शिला जैस्वाल वय वर्ष (45) , 4) नवनीत विश्वकर्मा . सर्व आरोपी राहणार नालासोपारा व वसई इथले असून त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली
त्यांच्या कडून ,सोन्याचे दागिने, मोटारसायकल, परदेशीं चलन, मनगटी घड्याळ, पासबुक , रोखरक्कम असा एकूण 5, 51,608/- असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौघुले ,उपयुक्त परिमंडळ- 2
वसई,श्री विनायक नरळे सपोआ तुळीज विभाग, वालीव वरिष्ठ पोनि कैलास बर्वे, पोनि ( गुन्हे) श्री राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी / ज्ञानेश फडतरे ,पोहव/ मुकेश पवार , मनोज मोरे , किरण म्हात्रे,सचिन दोरकर ,सतीश गांगुर्डे, बाळू कुटे ,
पो. अंम/ अभिजित गधरी, विनायक राऊत यांनी यशशवीरित्या कामगिरी पार पाडली.
प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड