पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली असून जव्हार तालुक्यातील गुरुवारी सतत पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील सर्व नदी नाल्यांना पूर आला होता.याचाच परिणाम हा अतिदुर्गम जव्हार मधील ग्रामीण भागातील कोटींचे रस्ते ,पुल,शेती ,घरे ,जनावरे हे देखील पुरामध्ये वाहून गेले आहेत .
तसेच या सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता अनेक ठिकाणी मोठ मोठ्या दगड,झाडे पडून रस्ते बंद गेले होते .काही ठिकाणी आतापर्यंत सुद्धा रस्ते मोकळे गेलेले नसून झाडे,दगड पडलेले असून तसेच पाहायला दिसत आहेत.ज्या ज्या काही ठिकाणी पत्रकार बांधव पोहचले नसतील त्या ठिकाणची परिस्थिती खूप बिकट परिस्थिती असेल परंतु या कडे सर्वच गावच्या प्रतिनिधी नी स्वतः लक्ष देवून आपल्या गावाची काय अडचण असल्यास ती शासन व प्रशासन यांचे लक्षात आणून द्यावी .
जव्हार तालुक्यातील मुसळधार पावसाचा हा ग्रामीण भागात खूप फटका बसला असून शासन किंवा प्रशासनाने यांची दखल घेवून आपल्या सर्वच विभागाला कळवून प्रत्येक ग्रामपंचायत मधील शिबिराचे आयोजन करून पावसामुळे प्रत्येक गावात कोणाची कोणती नुकसान झाली आहे ते कळेल.ज्यांची नुकसान झालेली असेल त्यांची तात्काळ पाहणी करून यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे ( काशिनाथ बुधर रीठीपाडा ग्रामस्थ)