जव्हार,दि.२२( सोमनाथ टोकरे )जव्हारमध्ये २४ तासांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने सर्वत्र झोडपून काढीत
सर्वत्र जलमय व अल्हाददायक दृष्य दिसत आहे.जव्हार च्या कशिवली घाटात सर्वत्र दाट धुके पसरले आहे. धुक्यामुळे रस्ते दिसेनासे झालेले आहेत.
जव्हार तालुक्यात जव्हार मंडळ १३४ मी. मी, साखरशेत १७४ मी. मी तर जामसर १३० मी. मी असे सरासरी १४६ मी. मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच शनिवारीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यात पावसाची संततधार जोरात सुरू आहे.शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे जांभुळ विहीर परीसरातील बुजवलेल्या नाल्यामुळे पाणी तेथील रहिवाशांच्या घरात शिरले होते.तर पावसामुळे चालतवड येथील उंबरखेडा गावातील काही शेतकर्यांचे बांध वाहुन गेले आहेत.
जव्हारच्या परिसरांत अनेक लहानमोठे धबधबे आहेत.त्यांनी पावसामुळे रुद्र रुप धारण केले आहे. जव्हार हे पर्यटन स्थळ असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते मात्र शासनाने पर्यटन स्थळावर घातलेल्या बंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.