Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या कुरघोडी राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश



माळशिरस तालुक्यामध्ये स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना कंटाळून भाजप प्रवेश - ज्ञानेश्वर काटे

    खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना मी राष्ट्रवादी सेवादल जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना या माळशिरस तालुक्यातील नेतेमंडळी कुरघोडीच राजकारण करत आहेत.




      या माळशिरस तालुक्यातील दिन दलित चेहरा असल्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना  एक सुशिक्षित चेहरा असल्यामुळे कामामध्ये सदैव डावलत होते विचारात घेत नव्हते असे असताना आपल्याच तालुक्यातील नेते आपल्याला डावलत असतील म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

     भाजपचे नेते भाजपचे नेते सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती श्रीमंत संग्रामसिंह ( दादा ) जहागीरदार यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मा. श्रीमंत संग्रामसिंहराजे ( दादा ) जहागीरदार यांनी माझा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पिलिव गावचे सरपंच नितीन मोहिते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजाभाऊ करांडे नानासाहेब मदने सचिन दादा मदने किशोर कदम पाटील पत्रकार प्रमोद भैस रणधीरसिंह जामदार समशेर रजपूत अमोल काटे उपस्थित होते.

       येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा आपली ताकद काही आहे हे दाखवून देणार आहे जे स्वतःला राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर आहेत मी तालुक्यामध्ये विकास कामे केली एवढा कोटीचा निधी आणला ते सांगतात आणलेल्या निधीचा हिशोब द्यावा विकास कामे कुठे दिसून येत नाहीत यांनी स्वतःच्या घशामध्ये निधी घातला आहे हि नेते तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

          म्हणून मी त्यांच्या राजकीय जीवनाला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व प्रवेश केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad