तीन महिन्यापासून पक्के लायसन कल्याण आरटीओ कडून मिळत नसल्याबाबत नागरिकांना उडवा उडवी ची उत्तरे rto कडून देण्यात येत असल्याची तक्रार भाजपचे वाहतूक सेल चे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांच्या कडे आली असता त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला व rto ला पुढील प्रमाणे पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला,
महोदय,
नियमाप्रमाणे आपल्या कार्यालयामध्ये कल्याण RTO परिसरातील नागरिकांनी लायसन साठी एप्लीकेशन देऊन लर्निंग व त्यानंतर डीएल साठी ट्रायल देऊन तीन महिने लोटले तरी नागरिकांना लायसन मिळाले नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता 8 ते 10 दिवसात लायसन्स पोस्टाने घरी येणे अपेक्षित आहे कारण नियमाप्रमाणे पोस्टाने घरी पाठवण्याचा करही जनताच भरते मग नागरिकांना त्रास का ? आताच महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जनतेची कामे व्हावीत त्यांना न्याय मिळावा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुरुवात केली पण कल्याण आरटीओ मध्ये बसलेले अधिकारी व कर्मचारी निगरगठ गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही महाराष्ट्रातील एकमेव कल्याण आरटीओ असे कार्यालय आहे की इथेच इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, बाकी इतर ठिकाणी हे प्रॉब्लेम नाहीये, असे का ? तिथे असलेले क्लर्क जाधव साहेब,मनमानी करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कल्याण RTO परिसरातील नागरिक विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, लायसन्स येईल त्यावेळेला घ्या नाहीतर काय करायचे ते करा, इंटरनेटच्या प्रॉब्लेम आहे,हे कारण पुढे करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे कल्याण RTO परिक्षेत्रातील लायसनधारक व नागरिक क्लर्क महेश जाधव यांच्या मनमानीला कंटाळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती
अन्यथा लोकशाही मार्गाने कल्याण RTO यांच्या विरोधात जनतेच्या हितासाठी जण आंदोल उभे करावे लागेल
याची नोंद घ्यावी
ही विनंती.
प्रतिनिधी /भानुदास गायकवाड