जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह मॅडम यांची भेट घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालय मधे बांधकाम विभागात आश्रम शाळा दुरुस्तीची कामे वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच जव्हार प्रकल्पातील ठक्कर बाप्पा योजनेची कामे वाटपात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायत ला दिलेला स्थान व शाळा दुरुस्तीची कामे वाटप ही भारतीय जनता पक्ष सांगेल त्या प्रमाणे कामे वाटप सुरू आहे.अधिकारीही भारतीय जनता पक्षाच्या तालावर नाचत असतील तर सर्व सामान्य जनतेचे काय हाल असतील ते न सांगितलेले बर या संदर्भात निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आणि कारवाई केली नाहीतर जव्हार तालुका बहुजन विकास आघाडीकरून आंदोलन करण्यात येईल.यावेळी बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच जव्हार सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले.,तलासरी ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील,माजी सरपंच संजय भला,राजेश वातास ग्रामपंचायत सदस्य संतोष भला,वंदना ठोंबरे,सुनील दखणे उपस्थित होते.