जव्हार :-सोमनाथ टोकरे
पर्यावरणाचा होत चाललेला र्हास लक्षात घेता आज मितीस वृक्षारोपणाची अत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे प्रत्येक सुजान नागरीकांनी ऐक तरी झाड लावने गरजेचे आहे.
पर्यावरनाची गरज लक्षात घेता पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, या पथकातील 75 होमगार्ड 112 वाहन चालक प्रशिक्षणार्थानी पालघर मुख्यालय येथे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण सुरु असताना आज दि 19 जून 2023 रोजी पालघर होमगार्ड दला तर्फे पालघर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे दीडशे झाडे लावुन वृक्षारोपण करण्यात आले.या वॄषरोपन कार्यक्रमाचे उद्घाटन मा. बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर तसेच मोटार परिवन पालघर प्रभारी अधिकारी आनंद परदेशी यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आले.