Type Here to Get Search Results !

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा गुरुवारी गंगाखेडात सपत्नीक सत्कार


         


गंगाखेड प्रतिनिधी 

                             सेंद्रिय शेती कडे शेतकऱ्यांना वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल एम आय लाइफस्टाइल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवारी गंगाखेड येथे करण्यात आले आहे.


 गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात असलेल्या द्वारका फंक्शन हॉल येथे सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे .संपूर्ण परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात मार्गदर्शन करून रासायनिक खतापासून व कीटकनाशक पासून होणारे जमिनीचे नुकसान टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर व त्यांच्या पत्नी सौ अलका सखाराम बोबडे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या सेंद्रिय शेती काळाची गरज या जनजागृती मोहिमेत बोबडे यांनी जिल्हाभर चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला आहे. त्याची दखल घेऊन होत असलेल्या या सत्कार सोहळ्यास परिसरातील शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बालासाहेब अंबादास निरस, शेषराव आव्हाड, तानाजी चांदणे, पांडुरंग गलांडे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad