Type Here to Get Search Results !

नेरले विकासेवा सोसायटी ची मागितलेली माहिती न दिल्यामुळे आमरण उपोषण करणार.माजी सरपंच औदुंबर भोसले



 सोसायटीची कागदपत्रे मागणीसाठी दि.24/2/2023 रोजी व 21/4/2023 रोजी यांनी सहाय्यक निबंधक करमाळा व सचिव यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.त्यातील काही कागदपत्रे दिली परंतु राहिलेले कागदपत्रे आज पर्यंत दिली नाहीत.आम्हाला सांगितले जाते सोसायटी च्या गोपनीयता मुळे कागदपत्रे तुम्हाला देऊ शकत नाही.सहकारी सोसायटीचा सभासद हा मालक असतो.सहकारी सोसायटीच्या सर्व वस्तू कागदपत्रे मालमत्ता याच्यावर सभासद म्हणजे मालकाचा शंभर टक्के हक्क असतो.सचिव हा संस्थेचा म्हणजे सभासदांचा नोकर आहे सभासद म्हणजे मालकाने मागितलेली कोणतीही माहिती सचिव म्हणजे नोकरांनी देणे महाराष्ट्र सहकारी कायदा अधिनियमनुसार बंधनकारक असताना देखील माहिती दिली जात नाही.नेरले सोसायटीमध्ये 100 ते 125 तीस वर्षापासून पंधरा ते वीस वर्षापासून असलेले खरे सभासद वगळले व बोगस धाराशिव जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तसे सचिवाने स्वतःचे नाव ,बंधू गणेश पांडुरंग पाटील, गणेश ची पत्नी पूजा गणेश पाटील यांची नावे नियमबाह्य समाविष्ट केले आहे.एवढा अन्याय करून देखील ग्रामस्थ शांत आहेत.याचा गैरफायदा सचिव म्हणजे नोकर घेत आहे.अनेक वेळा कागदपत्रांची मागणी करून देखील माहिती दिली जात नाही. सचिवाची कुटुंबासह असलेली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे अन्याय सहन करणे आमच्या रक्तात नाही.मागणी केलेली माहिती 30/6/2023 पर्यंत न दिल्यास दि.5/6/2023 रोजी सहायक निबंध कार्यालयात मागितलेली सर्व माहिती मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणार आहे. माहिती मिळण्याशिवाय उठणार नाही. विशेष म्हणजे माझी शारीरिक परिस्थिती सक्षम नाही.माझ्या मेंदूला मार लागल्यामुळे मला महिन्यातून एक वेळेस झटका येत आहे मला दररोज तीन गोळ्या चालू आहेतत्याबाबत सर्व हॉस्पिटलची.कागदपत्रे मी अर्जासोबत जोडली आहेत.व झटका आल्याचे व्हिडिओ मा. सहाय्यक निबंधक करमाळा,मा.तहसीलदार करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा यांना त्यांच्या मोबाईलवर पाठवत आहे.उपोषणामुळे मला काही त्रास झाल्यास व मला धोका झाल्यास सर्वस्वी सचिव सदाशिव पांडुरंग पाटील,यांच्या पत्नी दैवशाला सदाशिव पाटील,बंधू गणेश पांडुरंग पाटील,गणेश ची पत्नी पूजा गणेश पाटील व संबंधित अधिकारी कर्मचारी जबाबदार राहतील.माझी ही तक्रार म्हणजे फिर्याद समजून माझ्या जीवितला धोका झाल्यास यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मा.सहाय्यक निबंधकसाहेब सहकारी संस्था करमाळा, मा.तहसीलदार करमाळा, मा.पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिनांक 21/6/2023 रोजी सोसायटीचे माजी संचालक व नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच माननीय औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad