रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात भरती करून सुरु केले उपचार*
वाहतूक पोलिसांवर होत आहे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
वाहतूक विभागाचे कर्मचारी म्हटले कि लोक वेगवेगळ्या पद्धतीने टीका करीत असतात परंतु या वर्दीच्या मागे देखील एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे हे मात्र विसरून जातो.
सध्या असाच एक माणुसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दि १९ जून २०२३ रोजी कल्याण-शीळरोड महामार्गावर डीएनएस बँक जवळ कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक वयस्कर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेला निदर्शनास आला तात्काळ कोळशेवाडी वाहतूक शाखेचे हवालदार सोनवणे, हवालदार महाजन, वार्डन उज्जैकर, तडवी आणि शिलावत या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनच्या 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सला बोलावून त्या व्यक्तीला शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले व उपचार सुरु केले. आपल्या कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीमुळे कोळसेवाडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिरसागर यांनी त्या कर्मचारीचे कौतुक केले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दी मागचा सर्वसामान्य माणूस पाहायला मिळाला त्यामुळे आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून वाहतूक पोलिसांकडे पाहावे आणि त्यांना कर्तव्य बजावण्यात सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी: भानुदास गायकवाड