Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई मुलीच्या संघाला प्रथम क्रमांक व महाराष्ट्र संघ उपविजेता



(महाराष्ट्र मुलाचा संघाला तिसरा क्रमांक)


टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन ऑफ उत्तर प्रदेश याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सातवी राष्ट्रीय सिनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता व मुंबई मुलीला चा संघाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व जिल्ह्यातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महाराष्ट्र सचिव मिनाक्षी गिरी आदि मान्यवरउपस्थित होते.




यावेळी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे 21संघ व मुलींचे 13 संघ उपस्थित होते. टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा झाला. यामध्ये .मुंबई च्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिला व महाराष्ट्र संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. यामध्ये महाराष्ट्र संघाकडुन (कॅप्टन) श्रावणी गायकवाड,पूनम बुकन,,.साक्षी राठोड ,आश्लेषा सोव्दारवाद,.दिव्य मिसळ,श्रद्धा वाकुरे,गीता शिंदे,अनुष्का सपकाळ, नेहा वडजे,तन्वी , साठे .प्रिया, मठपती, नसरीन मजकुरे, .धनश्री सोन , महाराष्ट्र उमन डायरेक्टर व सचिव धनश्री गिरी, आफ्रीन पठाण,




या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेल्या बद्दल तसेच मुंबई मुलीच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मिनाक्षी गिरी, ,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे ,विलास गिरीव नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड या सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संघाच्या विजया साठी मार्गदर्शक म्हणून स्वप्नील ठोंमरे, महेश मिक्षा महाराष्ट्र मार्गदर्शक विजय उंबरे व मुंबई मार्गदर्शक सिद्धेश गुरव या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News