जव्हार :-सोमनाथ टोकरे
आज दि 27 जून रोजी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ यांच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम निमित्ताने वाकडपाडा, आडोशी, सुर्यमाळ या शाळेमध्ये सत्कार करण्यात आले. आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी बोलताना सांगितले की गुणवंत विद्यार्थी भविष्यात आपल्या शाळेचे, आईवडीलाचे,गावाचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील तुमच्या कडुन समाजाची खुप मोठी अपेक्षा आहे. उच्च अधिकारी व मोठे उद्योजक आदिवासी भागात निर्माण झाले पाहिजे आणि ते यश तुम्ही संपादन करु शकता त्यासाठी सातत्याने अभ्यास करा , आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी आहोत असे मत श्री वाघ यांनी व्यक्त केले.
तसेच पत्रकार हनिफ शेख यांनी सांगितले की आपल्या पंखा वर विश्वास ठेवुन मोठी भरारी घ्या.जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो.समितीचे कार्याध्यक्ष मंगेश दाते आम्ही सर्व आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती टीम कायमच गुणवंतांचा सत्कार करते व अडीअडचणीला धावुन जातो.विद्यार्थ्यांनी कुठलीही अडचण आल्यास समितीशी संपर्क साधावा.रमेश बोटे उपाध्यक्ष, विठ्ठल गोडे सदस्य यांनी देखील मुलांना शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ सदस्य विष्णू हमरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता आदिवासी भागातील मुले चांगले गुण मिळवतात हे शिक्षक व विद्यार्थी यांची मेहनत आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रदीप वाघ, कार्याध्यक्ष श्री मंगेश दाते, सचिव संजय वाघ, उपाध्यक्ष रमेश बोटे, पत्रकार संघटनेचे हनिफ शेख जिल्हा प्रतिनिधी, वामन दिघा तालुका सचिव,सद्दाम शेख पत्रकार, गणेश वाघ पत्रकार, श्री नरेंद्र येले सरपंच, गीता पाटील सरपंच,श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, जेष्ठ नेते विष्णू हमरे, विठ्ठल गोडे पोलिस पाटील,दशरथ पाटील, संजय हमरे, निलेश ठोमरे,भारत बुधर देवचंद जाधव,भाऊ दोरे माजी सरपंच नरेंद्र वाघ, अशोक वाघ , ठवरे सर मुख्याध्यापक, कापडणीस सर मुख्याध्यापक सुर्य माळ ,वाकडपाडा व आडोशी शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.