जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा या कार्यक्षेत्रातील ग्राम शालेय समिती अध्यक्ष सोमनाथ टोकरे यांनी मोख्याचा पाडा, फणस पाडा, कुंभार खांड, काळशेती, कौलाळे,टोकारखंड, भोकरहटी,पवारपाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एकूण आठ जिल्हा परिषद शाळाचा विविध शैक्षणिक विकास आराखडा आर्थिक ग्रामसभेमध्ये सादर करण्यात आला.
नुकताच पालघर जिल्हा परिषद यांची शिक्षक मुख्यालय राहण्याचा सर्व सदस्यांनी स्वागतार्थ एक मताने ठराव मंजूर करण्यात आला. ते ऐतिहासिक निर्णयाचे सर्व तालुकास्तरावर स्वागत करण्यात आले.या शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांमध्ये शैक्षणिक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये रंग रंगोटी स्वच्छ शाळा सुंदर परिसर मुलांना सुख सुविधा तयार करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि शैक्षणिक विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे परंतु त्यामध्ये काही शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा असल्यामुळे शैक्षणिक समस्या किचनशेड दुरुस्ती, शाळा दुरुस्ती,मुलां-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय ,शौचालय दुरुस्ती, वॉल कंपाऊंड, नवीन वर्ग खोल्या, खेळाचे मैदान, वाचनालय, शाळेतील आतील मैदान ब्लॉक बसवणे, पाण्याची समस्या, डिजिटल प्रोजेक्टर बसवणे या सर्व मागण्या ग्रामपंचायत मध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्यांकडून व ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होताना दिसत आहे.तरी सदर आराखडा मजूर करून मिळावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.